Thursday, 14 April 2016

या जगात जो तो आपापल्याकरिता  जगतो,हेच खरे.वृक्षवेलींची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात,तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात.याला जग कधी प्रेम म्हणते ,तर कधी प्रीती म्हणते,कधी मैत्री म्हणते:पण खरोखरच ते आत्मप्रेमच असते.एका बाजूला ओलावा नाहीसा झाला,तर वृक्षवेली सुकून जात नाहीत;त्यांची मुळे दुसऱ्या बाजूला कुठे ओलावा आहे-मग तो जवळ असो ,नाही तर दूर असो हे पाहू लागतात.तो शोधून ती टवटवीत राहतात.

No comments:

Post a Comment